शिक्षण परिषद :-
प्राथमिक शिक्षणामध्ये प्रत्येक मूल शिकावे यासाठी शिक्षक शिक्षकांमधील संवाद महत्त्वाचा ठरतो . दिनांक 1सप्टेंबर 2016, या शासन परिपत्रकानुसार हाच उद्देश ठेवून शिक्षण परिषद आयोजित केली जाते. शैक्षणिक वर्ष जून पासून ते मार्च पर्यंत दरमहा शिक्षक गरजा आणि विद्यार्थी संपादक हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विषय निवडले जातात .

धुळे जिल्ह्यात संस्थेच्या वतीने PGI,NAS, कार्य प्रतवारी निर्देशांक, राज्य संपादणूक सर्वेक्षण ,राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, अध्ययन निष्पत्ती ,पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ,उपक्रमशील शिक्षकांचे उपक्रम, शिक्षकांचे नमुनानिहाय नमुना पाठ, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ,विद्यार्थी उपस्थिती अशा विषयांवर मार्गदर्शन, चर्चा अनुभवाची देवाण-घेवाण याद्वारे संवाद साधला जातो .
दरमहा केंद्रातील शिक्षक शिक्षण परिषदेच्या निमित्ताने एकत्र येऊन शैक्षणिक आंतरक्रिया घडवून आणतात.

शिक्षण परिषदेने दिव्यांग विद्यार्थी नियमित शैक्षणिक प्रवाहात राहण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते. कला कार्यानुभव सारखे शारीरिक शिक्षण हे विषय कसे घेता येतात याविषयी दिशा मिळावी. राष्ट्रीय व राज्य स्तरावर होणाऱ्या संपादन चाचणीतून संपादणूक पातळी वाढवण्यासाठी नेमक्या उपाययोजना शिक्षकांच्या लक्षात आल्या.
शैक्षणिक वर्ष 23- 24 मध्ये एकूण दहा शिक्षण परिषदा झाल्या. त्यामध्ये जिल्ह्यतील 88 केंद्रातील एकूण 1230शिक्षकांनी प्रभावी संवाद केला.