Welcome to District Institute of Education & Training Dhule

प्राचार्याचा संदेश

डॉ.मंजुषा सु. क्षिरसागर

नमस्कार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी कार्य करणारी जिल्हयाची शिखर संस्था असून, 19 जून 1995 च्या शासन निर्णयानुसार संस्था पुढील चार शाखांनुसार काम करत आहे.
1) सेवापूर्व व सेवातंर्गत शैक्षणिक प्रशिक्षण 2) शैक्षणिक तंत्रज्ञान व अनौपचारीक शिक्षण
3) अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन 4) नियोजन, व्यवस्थापन व प्रशासन
संस्था मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकारित करण्यासाठी सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण, शैक्षणिक संशोधन, ब्लेंडेड कोर्स निर्मिती, नवोपक्रम, ग्रंथ निर्मिती, व्हिडिओ निर्मिती, समावेशित शिक्षण, करिअर संधी यावर वेबिनार, शाळास्तरावर अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन यात सहाय्य इ. कार्य करीत आहेएकंदरीत NEP 2020 मध्ये अपेक्षित बदलांना स्वीकारुन बालशिक्षण ते बारावी पर्यंतच्या सर्व घटकांना सामावून घेत, शिक्षण सक्षमीकरणासाठी संस्था कार्यस्थ आहे. भविष्यातील सुजाण पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील मानवीय घटकांकडून गुणवत्तापूर्ण जबाबदार प्रयत्नांची वाटचाल सदैव अपेक्षित आहे.