इयत्ता तिसरी व पाचवीसाठी NAS-SLAS कार्यशाळा
NAS:-National Achievement Survey -राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने घेतलेले एक मोठे सर्वेक्षण आहे. राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शिक्षण पातळीचे सर्वेक्षण करणे आणि त्याचे मूल्यांकन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
SLAS-राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण या सर्वेक्षणात इयत्ता तिसरी पाचवी आणि आठवी चा सहभाग असतो.
धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये उत्तम परफॉरमन्स होण्यासाठी तसेच राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये उत्तम परफॉरमन्स होण्यासाठी इयत्ता तिसरी व पाचवीसाठी प्रश्न निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. कारण NASव SLASच्या परफॉर्मन्सवर PGI हाअवलंबून असतो. PGI म्हणजे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स हे राज्य व केंद्रशासित प्रदेशातील शालेय शिक्षणाच्या स्थितीबद्दल अंतदृष्टी प्रदान करण्याचे एक साधन आहे.
वरील उद्देश लक्षात घेऊन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने NAS-SLAS प्रश्न निवड कार्यशाळा दिनांक 23 /11 /2023 ते 24 /11 /2023 या कालावधीत घेण्यात आली त्यातून निवडक प्रश्न निश्चितीसाठी कार्यशाळा दि.28/11/2023तेदि.29/11/2023 या कालावधीत घेण्यात आली. त्यानंतर प्रश्नसंच निर्मिती करण्यासाठी मार्च महिन्यात सलग सहा दिवस कार्यशाळा घेण्यात आली.
प्रथम सरावासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता तिसरी व पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी पीडीएफ स्वरूपात प्रश्नपत्रिका संस्थेकडून देण्यात आली. दिनांक 27/3/ 2024 पर्यंत प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता तिसरी व पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या .त्यानुसार दिनांक 2/4/2024 रोजी प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थे व्यतिरिक्त इतर इयत्ता तिसरी व पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी पीडीएफ स्वरूपात प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या .त्यानुसार दि.2/4/2024रोजी प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली.
राष्ट्रीय ,राज्य स्तरावर होणाऱ्या संपादणूक चाचणीतून संपादणूक पातळी वाढवण्यासाठी नेमक्या अडचणी व त्यावरील उपाय योजना करण्यासाठी शिक्षकांना दिशा मिळाली.